आंजर्ले येथे येऊ घातलेल्या औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले आहेत. आंजर्ले परिसरातील बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा कोंड, साकुर्डे, सातांबा, देहेण, चाचवळ, केळशी, माळवी, चांदिवडे, सुकोंडी, आडे, कोंगळे या गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांची बैठक 25 जुलैला गोरेगाव येथे झाली. यात या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंजर्ले परिसरात टियाना ग्रुपने औष्णिक प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाविरोधात तीव्र पडसाद प्रकल्प जाहीर होताच उमटले. कंपनीकडून व काही तथाकथित पुढाऱ्यांकडून औष्णिक प्रकल्पांमुळे प्रदूषण होत नाही, असा डांगोरा पिटला जात आहे; मात्र पालघर डहाणू येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पांमुळे प्रदूषण होते हे मान्य केल्याचे समजते. त्यामुळे या औष्णिक प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ एकवटले. आता पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला परवानगी नाकारली असली, तरी कंपनीकडून पुन्हा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. गावकऱ्यांकडून विरोध होत असतानाच आता या परिसरातील मुंबईतील चाकरमानीही एकवटले आहेत.
25 जुलैला गोरेगाव पश्चिम येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये मुंबईतील चाकरमान्यांची एक सभा झाली. या सभेला बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा कोंड, साकुर्डे, सातांबा, देहेण, चाचवळ, केळशी, माळवी, चांदिवणे, सुकोंडी, आडे, कोंगळे या आंजर्ले परिसरातील गावांधमील मुंबईत कामाला असलेले चाकरमानी उपस्थित होते. शशिकांत धाडवे, गजानन पडियार, चंद्रकांत मोहिते, अरविंद वजीरकर, दिनेश जोशी, मधुकर तळवटकर यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. हा प्रकल्प आपल्या मुळावर उठणार आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प आंजर्ले परिसरात होऊ द्यायचा नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. या प्रकल्पाविरोधात हंगामी कृती समितीची स्थापनाही यावेळी करण्यात आली. या समितीच्या वतीने लवकरच आडे, केळशी, इळणे, सुकोंडी देहेण परिसरात सभा आयोजित करण्यात येणार आहे आणि ग्रामस्थांना या चळवळीत सहभागी करून घेतले जाणार आहे.
(c) Copyright 2010, Shreerang Ketkar, All Rights reserved.
Visit Anjarla / Anjarle आंजर्ले a Beautiful village with a sea shore extending to 2 Km with clear white sand ...
Sunday, 1 August 2010
Sunday, 25 July 2010
आंजर्ले खाडीपात्र गाळाने भरले
आंजर्ले खाडीतील गाळ उपसण्यात न आल्याने खाडी गाळाने भरली आहे. वादळापासून नौका सुरक्षित ठेवण्यासाठी आजही हर्णै बंदरातील मच्छीमार या खाडीचा आधार घेतात. वादळ झाल्यावर नौका सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हर्णै बंदर सुसज्ज जेटीअभावी कुचकामी ठरते. अशावेळी नौका सुरक्षित ठेवण्यासाठी आंजर्ले खाडीत नेऊन नांगरण्यात येतात. त्यामुळे या खाडीला महत्त्वाचे स्थान आहे.

या खाडीअंतर्गत मासेमारी चालते. बोय, पालू, शिंगटी असे मासे पकडले जातात. तसेच कालव, शिंपल्या, खेकडेही पकडले जातात. या खाडीअंतर्गत चालणाऱ्या मासेमारीमुळे अनेकांना आर्थिक लाभ होतो. अडखळ मोहल्ल्यातील काही कुटुंब तर खाडीतील खेकडे, कालवे, शिंपल्या पकडून त्या विकून गुजराण करतात. खाडीत गाळ भरून ती उथळ झाल्याने याअंतर्गत चालणाऱ्या मासेमारीला फटका बसला आहे. कारण खाडी जेवढी खोल तेवढी माशांची संख्या जास्त. याबरोबरच गाळामुळे खाडी उथळ झाल्याने उधाणाच्या भरतीच्यावेळी खाडीचे पाणी खाडीच्या दुतर्फा असलेल्या शेतांमध्ये घुसून शेतजमीन खारवट होत आहे. यासाठी आता खाडीतील गाळ उपसणे गरजेचे आहे.
(c) Copyright 2010, Shreerang Ketkar, All Rights reserved.
Sunday, 16 May 2010
आंजर्ले - टियाना प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध.
दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील नियोजित टियाना ग्रुपच्या औष्णिक वीज प्रकल्पाविरोधात परिसरातील जनता एकवटणार आहे. टियाना ग्रुपच्या 16800 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोळशासाठी आंजर्ले खाडीत जेटी बांधण्यात येणार आहे. या जेटीवरच जहाजामार्फत कोळसा उतरण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे आंजर्ले येथील सावणे गावानजिक मुख्य केंद्र होणार आहे. या प्रकल्पामुळेआंजर्ले व परिसरातील सुमारे 300 गावे बाधित होणार असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आंजर्ले परिसरात 90 टक्के व्यवसाय बागायतदारी आहे. यात आता पर्यटनाची भर पडत आहे. परंतु या प्रकल्पामुळे येथील परंपरागत व्यवसाय बागायतदारी व पर्यटन व्यवसाय या दोन्हींचे अस्तित्वच नष्ट होणार असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पाला पर्यावरण व वन मंत्रालयाने प्राथमिक परवानगी नाकारली आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी थेट पर्यावरण वनमंत्रालय नवी दिल्ली यांना लेखी निवेदन देऊन या प्रकल्पाला हरकत घेतली होती.
आंजर्ले येथील नियोजित औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आंजर्ले परिसरातील बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा पोल, साकुर्डे, सातांबा आदी गावातील व अन्य परिसरातील गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकतीच या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली असली तरी कंपनीकडून पुन्हा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

Subscribe to:
Posts (Atom)