Thursday, 26 September 2013

लारी

लारी हे चांदीचे नाणे होते, त्याचे वजन सुमारे ४.७ ग्रॅम असे. सुमारे ७.५ ते १० से. मी. लांबीची आणि १/३ से. मी. जाडीची चांदीची तार केसांना लावण्याच्या आकड्याप्रमाणे वाकवून हे नाणे तयार केलेले असे. हा आकडा म्हणजेच हे नाणे. ह्या आकड्याचे दोन्ही पाय ठोकून चपटे करीत आणि त्यांच्यावरच शिक्का उमटवित. हि नाणी आदिलशाही सल्तनित कोकण किनाऱ्यावर पाडली जात. याचा वापर प्रामुख्याने कोकणातच होई.





दक्षिण इराणात लार नावाचे एक शहर होते. आणि त्याच नावाचा एक प्रांत होता तिथे हे नाणे पाडण्यास प्रथम सुरवात झाली,आणि म्हणून त्याला लारी असे म्हणतात. दाभोळी लारी, चोली लारी, बसरी लारी , हुर्मुजी लारी , असे उल्लेख जुन्या कागदपत्रात येतात. त्यातील दाभोळी वगेरे विशेषणे हि अर्थातच ती नाणी ज्या गावी पाडली जात, त्या गावाच्या नावावरून दिली असली पाहिजेत
संदर्भ - शिवकालीन चलने - पान ३४८-९, "श्री राजा शिवछत्रपती" - गजानन भास्कर मेहेंदळे


आभार : शंकर बर्वे




(c) Copyright 2013, Shreerang Ketkar, All Rights reserved.

Thursday, 27 December 2012

सुवर्णदुर्ग

रत्नागिरी जिल्हातील 9 तालुक्यात शिवकालीन 25 किल्ले आहेत. यापैकी 13 गिरीदुर्ग तर 12 जलदुर्ग आहेत. दापोली - आंजर्ल्यापासून जवळ असलेला सुवर्णदुर्ग समुद्रात एका विशाल खडकावर बांधला आहे. या जलदुर्गाचे संरक्षक दुर्ग म्हणून गोवा दुर्ग, फत्तेगड व कनकदुर्गही उभारण्यात आले. खडक फोडून तयार केलेली तटबंदी हे सुवर्णदुर्गाचे वैशिष्ट्य. शिलाहारांपासून या गडाचा इतिहास सांगता येतो. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतला हा गड 1660-1676 मध्ये जिंकला आणि 1818 पर्यंत तो स्वराज्यातच राहीला. सिद्दीने सुवर्णदुर्ग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण कान्होजी आंग्रे यांनी तो डाव शिताफीने हाणून पाडला. गडावर आता काही तोफा व जुन्या इमारतींचे पडके अवशेष आढळतात. या किल्ल्याचा परिसर जवळपास ८ एकर आहे. मुरुड, हर्णॆ किंवा आंजर्ल्याहून होडीने या जलदुर्गावर पोहोचता येते. 

Wednesday, 2 March 2011

आंजर्ले

निळ्या खाडीच्या काठाला, माझा हिरवाच गाव
जगात मी मिरवितो, त्याचे लावोनिया नाव
पुल ओलांडीता, पुढे रस्ता येईल तांबडा
घरी आणील सरळ, जरी दिसला वाकडा
माणसांच्या जागेसाठी, दाटी करतात माड
गर्द मधेच एखादे, आंब्या फणसाचे झाड
थोड्या पाय वाटा हिंडा, लाल तांबड्या वाकड्या
होड्या उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या

                                                                               - बा भ बोरकर 

(c) Copyright 2011, Shreerang Ketkar, All Rights reserved.