आंजर्ले गावातील पर्यावरणप्रेमी प्रशांत व जिल्पा नित्सुरे यांना "वसुंधरा मित्र" पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार त्यांना किर्लोस्कर आणि वसुंधरा क्लब तर्फे आयोजित केलेल्या आन्तरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल चे औचित्य साधून ६ डिसेंबर २०१३ रोजी जिल्हाधिकारी श्री. राजीव जाधव यांच्या हस्ते रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आला.
Visit Anjarla / Anjarle आंजर्ले a Beautiful village with a sea shore extending to 2 Km with clear white sand ...
Wednesday, 11 December 2013
Thursday, 26 September 2013
लारी
लारी हे चांदीचे नाणे होते, त्याचे वजन सुमारे ४.७ ग्रॅम असे. सुमारे ७.५ ते १० से. मी. लांबीची आणि १/३ से. मी. जाडीची चांदीची तार केसांना लावण्याच्या आकड्याप्रमाणे वाकवून हे नाणे तयार केलेले असे. हा आकडा म्हणजेच हे नाणे. ह्या आकड्याचे दोन्ही पाय ठोकून चपटे करीत आणि त्यांच्यावरच शिक्का उमटवित. हि नाणी आदिलशाही सल्तनित कोकण किनाऱ्यावर पाडली जात. याचा वापर प्रामुख्याने कोकणातच होई.
दक्षिण इराणात लार नावाचे एक शहर होते. आणि त्याच नावाचा एक प्रांत होता तिथे हे नाणे पाडण्यास प्रथम सुरवात झाली,आणि म्हणून त्याला लारी असे म्हणतात. दाभोळी लारी, चोली लारी, बसरी लारी , हुर्मुजी लारी , असे उल्लेख जुन्या कागदपत्रात येतात. त्यातील दाभोळी वगेरे विशेषणे हि अर्थातच ती नाणी ज्या गावी पाडली जात, त्या गावाच्या नावावरून दिली असली पाहिजेत
आभार : शंकर बर्वे
(c) Copyright 2013, Shreerang Ketkar, All Rights reserved.

संदर्भ - शिवकालीन चलने - पान ३४८-९, "श्री राजा शिवछत्रपती" - गजानन भास्कर मेहेंदळे
आभार : शंकर बर्वे
(c) Copyright 2013, Shreerang Ketkar, All Rights reserved.
Subscribe to:
Posts (Atom)