Thursday, 27 December 2012

सुवर्णदुर्ग

रत्नागिरी जिल्हातील 9 तालुक्यात शिवकालीन 25 किल्ले आहेत. यापैकी 13 गिरीदुर्ग तर 12 जलदुर्ग आहेत. दापोली - आंजर्ल्यापासून जवळ असलेला सुवर्णदुर्ग समुद्रात एका विशाल खडकावर बांधला आहे. या जलदुर्गाचे संरक्षक दुर्ग म्हणून गोवा दुर्ग, फत्तेगड व कनकदुर्गही उभारण्यात आले. खडक फोडून तयार केलेली तटबंदी हे सुवर्णदुर्गाचे वैशिष्ट्य. शिलाहारांपासून या गडाचा इतिहास सांगता येतो. शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतला हा गड 1660-1676 मध्ये जिंकला आणि 1818 पर्यंत तो स्वराज्यातच राहीला. सिद्दीने सुवर्णदुर्ग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण कान्होजी आंग्रे यांनी तो डाव शिताफीने हाणून पाडला. गडावर आता काही तोफा व जुन्या इमारतींचे पडके अवशेष आढळतात. या किल्ल्याचा परिसर जवळपास ८ एकर आहे. मुरुड, हर्णॆ किंवा आंजर्ल्याहून होडीने या जलदुर्गावर पोहोचता येते.